*कोकण Express*
*सावंतवाडी आगारातून चालक, वाहक व अन्य कर्मचारी मुंबईतील बेस्टच्या सेवेसाठी पाठवल्यास शहर भाजपातर्फे तीव्र आंदोलन…*
*भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा इशारा…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
_आगारातून चालक, वाहक व अन्य कर्मचारी मुंबईतील बेस्टच्या सेवेसाठी पाठवल्यास शहर भाजपातर्फे तीव्र आंदोलन छेडत आगारातून एकही बस सोडू देणार नाही, असा सज्जड इशारा भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिला.याबाबतचे निवेदन शहर मंडल भाजपच्यावतीने त्यांनी सावंतवाडीआगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांना सादर केले. यावेळी शहरध्यक्ष नगरसेवक सुधिर आडीवरेकर, आनंद नेवगी, समृद्धी विरनोडकर, दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, युवक शहरध्यक्ष संदेश टेमकर, विनोद सावंत, दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते. गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी आगारातून कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेसाठी मुंबई येथे पाठवण्यात येत आहे. परंतु परिवहन मंडळाकडून त्यांची योग्य ती काळजी घेतली जात नसल्यानेच कुडाळ तालुक्यातील बेस्टच्या सेवेत गेलेले २० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाले होते. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातून बेस्टच्या सेवेसाठी कर्मचारी पाठवू नये असा इशारा आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे._