*कोकण Express*
*देवगडात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतर्फे 100% वसुली करणाऱ्या विकास संस्थांचा केला सत्कार*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतर्फे आठ विकास संस्थांचा सत्कार..*
*कार्यक्रमाचा शुभारंभ दिप प्रज्वलन करून बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले*
हा सत्कार जामसांडे येथील सांस्कृतिक भवनात पार पडला मे ळाव्यात व्यासपिठावर माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बॅकेचे संचालक प्रकाश बोडस ,श्रीम.प्रज्ञा ढवण, समिर सावंत , प्रकाश राणे,आरिफ बगदादी ,संदिप साटम,रवि पाळेकर जिल्हा बॅकेचे कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, क्षेत्रवसुली सरव्यवस्थापक देवानंद लोकेगांवकर कर्ज विभाग प्रमुख श्री. के बी वरक,तालुका विकास अधिकारी संजय घाडी, देवगड शाखा व्यवस्थापक अवधूत गोडवे,विकास संस्थांचे चेअरमन,सचिव सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ३० जून अखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जा ची १००टक्के वसुली केल्याबद्दल पडेल विकास संस्था, किंजवडे विकास संस्था, महाळुगे, नाद,ओंबळ, शेवरे विकास संस्था, नाडण विकास संस्था, कुणकेश्वर विकास संस्था, वेळगिवे विकास संस्था,श्री भगवती विकास संस्था मुणगे, मोंड विकास संस्था अशा १००टक्के कर्ज पूर्ण फेड केलेल्या ८ विकास संस्थांचा सत्कार करण्यात आला