देवगड पर्यटनाला मिळणार चालना..!

देवगड पर्यटनाला मिळणार चालना..!

*कोकण Express*

*देवगड पर्यटनाला मिळणार चालना..!

*

*आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतून*

*महाराष्ट्रातील समुद्रकिनार्‍यावर प्रथमच देवगड येथे सुरू होणार झीप लाईन*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड जामसंडे  नगरपंचायत व फ्लाईंग कोकण एडवेंचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड समुद्रकिनार्‍यावर सुरू होणारी झीप लाईन पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली समुद्रकिनार्‍यावरील अशा प्रकारची झीप लाईन ही महाराष्ट्रातील पहिलीच झीप लाईन आहे

या पत्रकार परिषदेला देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजा वालकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गव्हाणे फ्लाईंग कोकण एडवेंचर क्लबचे प्रमुख श्रीकांत जोईल व वैष्णवी जोईल, तसेच सिंधू सह्याद्री एडवेंचर संस्थेचे प्रमुख रामेश्वर सावंत उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत रामेश्वर सावंत यांनी बोलताना या प्रकल्पाची सुरक्षेच्यादृष्टीने माहिती दिली या प्रकल्पामध्ये वापरलेले दोर हे स्टीलचे असून एका वेळी १८०० किलो वजन घेण्याची क्षमता आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व चाचण्या पार केलेली ही यंत्रणा लवकरच देवगडवासी यांच्या सेवेत येणार आहे .स्थानिकांना व पर्यटकांना परवडेल एवढ्या कमी पैशात झीप लाईन चा आनंद घेता येणार आहे

महाराष्ट्रातील समुद्रकिनार्‍यावर असलेली ही महाराष्ट्रातील पहिली झीप लाइन असल्याने पर्यटकांचा मोठ्याप्रमाणात ओढा या प्रकल्पाकडे येईल अशी आशा या झीप लाइन  चे संचालक श्रीकांत जोईल यांनी व्यक्त केले श्रीकांत जोईल यांनी बोलताना मी इथला भूमिपुत्र असून देवगडच्या भूमीत पर्यटनासाठी काहीतरी करावे अशी इच्छा माझ्या मनात होती यामुळे झीप लाइनच्या माध्यमातून मी देवगड वासियांच्या सेवेत उतरलो आहे ही संकल्पना २०१७ सालात मी मांडली होती मात्र लॉकडाउनच्या काळात मी देवगड मध्ये आलो आणि मला ती प्रत्यक्षात आणणे शक्य झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!