*कोकण Express*
*नाटळ राणेवाडी येथे वाडीतील विकास कामा संदर्भात बैठक संपन्न*
नाटळ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मधील राणेवाडी येथील विकास कामासंदर्भात आज राणेवाडी मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संदेश (गोट्या) सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीला कामानिमित्त मुंबई येथे राहत असलेले राणेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते राणेवाडीत ये जा करण्यासाठी अनेक वर्ष पुलाची मागणी करण्यात येत होती काही दिवसापूर्वी माननीय आमदार श्री नितेश राणे व श्री संदेश ( गोट्या) सावंत यांच्या समावेत राणेवाडीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांची मुंबई येथे भेट घेतली होती व मंत्री महोदयांना विकासकामा संदर्भात निवेदन दिले होते या निवेदनाची त्वरित दखल घेऊन मंत्री महोदयांनी राणेवाडीतील पुलासाठी व जोड रस्त्यासाठी संपूर्ण तरतूद केली आहे या जोड रस्त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करत आपली जमीन देण्याचे ठरविले आहे अनेक वर्षाच्या ग्रामस्थांच्या प्रलंबीत मागण्या मार्गी लागल्या मुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रविंद्र चव्हाण, आमदार श्री नितेश राणे माजी जि प अध्यक्ष श्री संदेश ( गोट्या) सावंत यांचे आभार मानले या बैठकीला सौ सुप्रिया राणे सौ नम्रता राणे सौ वंदना राणे सौ जयश्री राणे श्री प्रताप राणे श्री अरविंद राणे श्री दिवाकर राणे श्री शांताराम राणे श्री विश्वास राणे श्री सतीश राणे श्री दशरथ राणे श्री सुनील राणे श्री राजू राणे श्री सुभाष राणे श्री दिवाकर राणे श्री मोहन राणे श्री प्रमोद राणे श्री महेश राणे श्री संतोष राणे व श्री संदीप परब इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते