*कोकण Express*
*शिवसेनेला निवडणूक आयोगाने धनुष्य चिन्ह तात्पुरतं गोठवलं…*
*उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागणार…*
*सोमवार पर्यंत दोन्ही गटांना नवीन चिन्ह निवडण्याचा कालावधी…*
*मुंबई*
राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला अखेर आज निवडणूक आयोगाने दणका दिला.आगामी काळात होणाऱ्या अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरें आणि शिंदे या दोन्ही गटांना शिवसेना नाव किंवा धनुष्यबाणाचे चिन्ह वापरता येणार नाही असा निकाल देण्यात आला.आगामी काळात होणा-या पोट निवडणुकीसाठी तात्पुरते धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आले आहे. सोमवार पर्यंत संबंधित दोन्ही गटांना आपले नवीन चिन्ह निवडण्याचा कालावधी देण्यात आला.आज याबाबतची सुनावणी झाली त्यामुळे या निर्णयाचा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे