*कोकण Express*
*कणकवलीतील वसंत सावंत बुवा यांचे निधन*
*कणकवली / प्रतिनिधी*
कणकवली परबवाडी येथील रहिवासी दत्तभक्त वसंत महादेव सावंत उर्फ सावंत बुवा (84) यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. परबवाडी येथील दत्त मंदिरात ते नेहमी दत्त सेवेत लीन असायचे. तेथील मंदिराची उभारणीही त्यांनी केली होती. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांची परबवाडीच्या स्मशानभूमीत वैकुंठरथातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश सावंत यांचे ते वडील, संकेत पाटील यांचे ते आजोबा होत.