*कोकण Express*
*पॉवर लिफ्टींग स्पर्धेत भरणीच्या तृप्ती सावंत ला सुवर्ण पदक*
राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई चे करणार प्रतिनिधीत्व
*सिंधुदुर्ग*
मुंबई शहर पॉवर लिफ्टींग असोसिएशन आयोजित पॉवर लिफ्टींग स्पर्धेत मुळच्या भरणी ता. कुडाळ येथील सध्या ठाणे येथे असलेल्या तृप्ती आबाजी सावंत यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. ६९ किलो वजनी गटात सिनिअर गटात दोन सुवर्ण व एक रौप्य पदकाची त्यांनी कमाई केली. मुंबईतील करी रोड येथे या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
तृप्ती सावंत या ठाणे म्युनसिपल कार्पो. जीमच्या ट्रेनर आहेत. यापूर्वी तृप्ती सावंत यांनी क्लासिक आणि बेंच प्रेस त्याप्रकारात त्यांनी अव्वल यश मिळविले आहे. चाळकेज फिट अॅण्ड फाईल जीम ठाणे येथे त्या या खेळाचा सराव करतात. छत्रपती पुरस्कार विजेते अनंत चाळके यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. चाळके सरांचे मार्गदर्शन जितेंद्र यादव या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य सरावासाठी मदत यामुळे आपण हे यश मिळवु शकलो असे त्या सांगतात. तृप्ती सावंत या मुळच्या सिंधुदुर्ग भरणी (कुडाळ) येथील रहिवाशी आहेत.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत धैर्याने सामना करत त्यांनी जीम ट्रेनर म्हणून ठसा उमठविला आहे. राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी त्या मुंबईचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेतही आपण यशस्वी कामगिरी करू राष्ट्रीय पातळीवर आपण उतरूच असा विश्वास तृप्ती सावंत व्यक्त करतात. काही दिवसापूर्वी तृप्ती सावंत यांचे वडिल आबाजी सावंत यांचे निधन झाले. आपल्या वडिलांना ही पदके अर्पीत करत असल्याचे त्या म्हणाल्या. कठोर परिश्रम योग्य मार्गदर्शन सरावात सातत्य योग्य आहार आणि आव्हान स्विकारण्याची तयारी या गोष्टी अंगिकारल्यास यशस्वी होण्यास काही कठिण नाही असे तृप्ती सावंत सांगतात.
मुंबई येथील झालेल्या पॉवर लिफ्टींग स्पर्धेत अरूण नायर-सिल्व्हर, चंदा जैसवाल-सुवर्ण, धर्मेंद्र यादव-सुवर्ण, गितांजली दस्तुर-सुवर्ण, गोपिनाथ पवार-सुवर्ण, महेश पद्माकर-सुवर्ण, निवेदिता खारकर-सुवर्ण, ओमकार मोरे-कास्यं, प्रांजली नरावडे-सुवर्ण, प्रशांत पडवी- कास्यं, राजेश शेट्ये-सुवर्ण, राकेश घाडीगांवकर-कास्यं, रोशन गावाणकर-सुवर्ण, रूबादास-सुवर्ण, सागर मिराशी-सुवर्ण, साईल उतेकर-सुवर्ण, समृद्धी देवलकर-सुवर्ण, शितल ताम्हाणे-सुवर्ण, तानाजी पाटील-सुवर्ण, तुषार भोगले-कास्यं पदक मिळवुन विजेते ठरले आहेत. या सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.