आदर्श ग्रामसेवक व माजी ग्रामविकास अधिकारी ‘एल एम नाईक’ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ च्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

आदर्श ग्रामसेवक व माजी ग्रामविकास अधिकारी ‘एल एम नाईक’ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ च्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

*कोकण Express*

*आदर्श ग्रामसेवक व माजी ग्रामविकास अधिकारी ‘एल एम नाईक’ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ च्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप*

*कणकवली ः प्रतिनिधी*

माजी आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दिवंगत एल एम नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साद फाउंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षा गितांजली लक्ष्मण नाईक यांच्याहस्ते कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका,कर्मचारी तसेच जांभवडे पंचक्रोशीचे प्रतिष्ठीत नागरीक , माजी सरपंच व माजी ग्रामविकास अधिकारी भाई उर्फ मनोहर मडव, प्रा.अपूर्वा गोलतकर,कणकवली पंचायत समिती शिक्षण विभागाचे हेड क्लार्क आनंद जाधव, चैतन्य क्लासचे संचालक अच्युत देसाई,युनिक अकॅडमी कणकवली प्रमुख सचिन कोर्लेकर उपस्थित होते.
साद फाउंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षा गितांजली लक्ष्मण नाईक या सध्या कुडाळ नगरपंचायत येथे प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.त्याचे वडील दिवंगत माजी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण महादेव नाईक उर्फ एल एम नाईक यांनी वारगाव , ओसरगाव,बोर्डवे,कसाल, वाघेरी,पियाळी, खारेपाटण या गावातून ग्रामसेवक म्हणून उत्तम कार्य केले होते.त्यामुळेच त्यांना तत्कालिन माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सूक्ष्म व लघु उद्योग केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे साहेब यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला होता. वडिलांच्या कामाची प्रेरणा घेऊन गितांजली लक्ष्मण नाईक यांनी सुद्धा आई लतिका नाईक ,भाऊ गौरेश नाईक, आजोबा भाई मडव यांच्या सहकार्याने 4 थी नंतरचे शिक्षण पूर्ण करत स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून प्रशासकीय अधिकारी पद मिळवले. गितांजली लक्ष्मण नाईक यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजातील गरजू, होतकरू , अन्यायग्रस्त आणि वंचित घटकांना स्वतःसह समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मदत व्हावी यासाठी बहुुद्देशीय अशी “साद फाउंडेशन सिंधुदुर्ग” या नावाची संस्था 1 ऑगस्ट 2022 रोजी स्थापन केली. या संस्थेची स्थापना करताना त्यांनी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना माजी ग्रामविकास अधिकारी भाई उर्फ मनोहर मडव, आई लतिका लक्ष्मण नाईक,भाऊ गौरेश नाईक यांच्या हस्ते, “एल एम नाईक स्मृतीप्रित्यर्थ ‘ऋणाई’ पुरस्कार” देऊन सन्मानित केले यामध्ये, कुडाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय चव्हाण ,पोलीस निरीक्षक बापू खोत, ज्येष्ठ साहित्यिक व कवी अजय कांडर, सिनेअभिनेते निलेश पवार, प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. प्रशांत मडव, पत्रकार राजन चव्हाण,निवेदक राजेश कदम, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग , आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे, सत्यवान मडवी, शैक्षणिक क्षेत्रातील एक नामवंत शिक्षक अच्युत देसाई,समाजसेविका अर्पिता मुंबरकर आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!