*कोकण Express*
*अखंड हिंदुस्थानात राहून भारत माता की जय, वंदेमातरम् म्हणणं गुन्हा असेल तर राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिक असा गुन्हा वारंवार करत राहिलं..*
*मनसे पदाधिकाऱ्यांनवर दाखल झालेला गुन्हाचा प्रकार निंदनीय- अभय देसाई*
दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली NIA, ED या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड केली असता, पुण्यात काही जणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवरचा निषेध मनसे पदाधिकारीनी सावंतवाडी येथील डी वाय एस पी येथे केला. हा निषेध करणे गरजेचे होते परंतु पोलीस प्रशासनने भारतमातेच बद्दल प्रेम असणाऱ्यावर गुन्हा दाखल केला.
पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा आपल्या देशात झाल्या
आणि त्या विरुद्ध मनसेने सावंतवाडी येथे निषेध दाखवला परंतु असे केल्यावर प्रशासनाने मनसे पदाधिकारीवर गुन्हा दाखल केला हा प्रकार पूर्णपणे निंदनीय बाब आहे. अखंड हिंदुस्थानमध्ये राहून भारत माता कि जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्यावर जर आमच्या पदाधिकारीवर गुन्हा दाखल करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही अशी भावना मनसे विभाग अध्यक्ष अभय पांडुरंग देसाई यांनी दिली आहे.पुणे येथे पाकिस्तान बद्दल घोषणा केलेल्या सरकारला चालतील परंतु आम्हीरस्त्यावर उतरून त्याबद्दल निषेध केला हे मात्र प्रशासनला खुपते. केलेला निषेध हा चुकीचं आहे का ? असा सवाल अभय देसाई यांनी सरकारला विचारला आहे.सरकारने PFI संघटनेवर 5 वर्षाची बंदी आणली ह्या निर्णयचा आम्ही स्वागत केलाच परंतु पुणे मध्ये घडलेल्या घटनेविरुद्ध आवाज उठवला तो गुन्हा असेल तर आधीच सरकार आणि आतच सरकार मध्ये फरक काय? हे अजब सरकार आहे असे म्हणत देसाई यांनी पोलीस कारवाहीला विरोध दर्शवला आहे.हे असे गुन्हे दाखल करून काय सिद्ध करण्याचा हेतू असावा हे विचार करणाऱ्यासारखे आहे. अशा प्रकारचे चुकीचे गुन्हे दाखल होत असतील तर जिल्ह्यातील एकही मनसे पदाधिकारी शांत बसणार नाही हे लक्षात ठेवावे.