*कोकण Express*
*कणकवलीत श्वानांचे निर्बिजीकरण व ॲन्टी रेबीज लसीकरण मोहीम सुरु*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत हद्दीतील श्वानांना पकडणे व त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रीया करणे, औषधोपचार करून त्यांना मूळ अधिवासात सोडणे या कामाकरीता कणकवली नगरपंचायतीने व्हेट्स फॉर ॲनिमल्स, सातारा या संस्थेची निवड केली आहे.

त्यामुळे कणकवलीत भटके कुत्रे निर्बीजीकरण करण्यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलं आहे.
कणकवली नगरपंचायत ने कुत्रे निर्बीजीकरण कामावर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्याकरीता समिती निधी सावंत, सुप्रिया दळवी, डॉ. सुहास पावसकर, अनुप मोडक यांची गठित केली आहे. त्यानुसार प्राणीक्लेश प्रतिबंध कायदा १९६० महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ प्राणी उत्पत्ती प्रतिबंध नियम, २००१ चे काटेकोरपणे पालन संबंधीत कंत्राटदार यांनी करणे आवश्यक असल्याने याकामी कंत्राटदार व्हेंट्स फॉर ॲनिमल्स, सातारा यांचे कामावर पर्यवेक्षण, नियंत्रण करणे व वरील नमूद कायदे / नियम / सुचनांचे काटेकोर पालन होते किंवा कसे याबाबत खातरजमा करणेसाठी शहरातील या क्षेत्रातील तज्ञ / अनुभवी डॉक्टर / सेवाभावी व्यक्ती / प्राणीमित्र / नागरीकांचा याबाबत लक्ष असणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे समीर नलावडे यांनी कळविले आहे .