आपल्याला राजकीय स्पर्धक नाही,मात्र स्पर्धा जनतेने ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याची ; मंत्री रवींद्र चव्हाण

आपल्याला राजकीय स्पर्धक नाही,मात्र स्पर्धा जनतेने ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याची ; मंत्री रवींद्र चव्हाण

*कोकण Express*

*आपल्याला राजकीय स्पर्धक नाही,मात्र स्पर्धा जनतेने ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याची ; मंत्री रवींद्र चव्हाण*

*कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांशी साधला संवाद

*विकास निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही एक पाऊल पुढे या मी चार पाऊल पुढे येईन

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्हाला राजकीय स्पर्धकच नाहीत मात्र आपली स्पर्धा जतेने आपल्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आहे.त्यासाठी येथील जनतेला विकास आणि रोजगाराची संधी निर्माण करून देवूया. मी तुमच्या सोबत आहे.पालकमंत्री म्हणून संपूर्ण वेळ देण्यास मी तयार आहे. जनतेसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही.तुम्ही एक पाऊल पुढे टाका मी चार पाऊले पुढे येईन.आपल्या कामातून भारतीय जनता पार्टीचे बूथ सुद्धा सक्षम करुया.असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना केले.
कणकवली प्रहार भवन येथे कणकवली,देवगड,वैभववाडी विधानसभा मतदरसंघातील भाजपा पदाधिकारी यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,माजी आमदार ऍडव्होकेट अजित गोगटे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,अमोल तेली, कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मिस्त्री ,वैभववाडी तालुका अध्यक्ष नासीर काझी, आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले,
सिंधुदुर्ग जिल्हा चां पालकमंत्री झालो त्याचा मला आनंद झाला . एकत्रित प्रयत्न करून संघटनात्मक काम करणारे तुम्ही कार्यकर्ते आहात. म्हणूनच आज जिल्हा परिषद राज्यात एक नंबर आली. वेंगुर्ले नगरपालिका आदर्श ठरली.असेच काम करत रहा. उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात त्यांचा आदर्श घ्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दररोज उत्पन्नात वाढ करायचे आहे याचाच अर्थ प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात भरीवशी वाढ झाली पाहिजे ते काम कार्यकर्ता म्हणून तुम्ही करा तुम्ही तुमच्या सोबत आहे कधीही हाक द्या असे ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टी कधी फुटली नाही. त्याला कारण पक्षाचे विचार,पक्षातील एकसंघता,आपलेपणा,पक्ष म्हणजे एक कुटुंब, ही कार्यपद्धती देशात भारतीय जनता पार्टी अखंडितपणे राहण्यास महत्त्वाची ठरली आहे.
मजी मंत्री आणि नेते प्रमोद महाजन यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर जबाबदारी देवून काम करून घतेले, तेव्हा वाटले नव्हते की मी या पदापर्यंत पोचेन ही भाजपच्या संघटनात्मक कार्यपद्धतीची ताकद आहे.कारण हा पक्ष देश आणि राज्याच्या जनतेच्या हितासाठी काम करतो.तर प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सभगी असतो.असेही यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले.
देशात भाजपाने लढले नाहीत असे १४४ मतदार संघ आहेत. त्यात राज्यात १६ आहेत ते जिंकवयाचे आहेत.मोदींसाठी प्रत्येकाने एक मतदार संघ जिंकून देण्याचा संकल्प करूया असेही आवाहन केले.
येणाऱ्या पिढीसाठी काय करावे याचा विचार करून काम करुया.एका गावतील ४०० कुटुंब कशी रोजगार देवून आर्थिक सक्षम करता यातील त्यासाठी काम करा. वेगलेगळ्या जबाबदाऱ्या घ्या.यश नक्की मिळेल.असेही पालकंत्र्यांनी आवाहन केले.
आमदार नितेश राणे अभ्यासू आहेत. शासकीय बैठीत त्यांनी अनेक कामावर चर्चा घडविली.आजपर्यंत फक्त २ कोटीच निधी खर्च झाला आहे . उर्वरित निधी विकास कामांसाठी आपल्याला खर्च करायचा आहे. तो योग्य पद्धतीने खर्च होईल मात्र कोणतीही निवडणूक छोटी समजू नका प्रत्येक निवडणुकीत ताकतीने काम करा अती आत्मविश्वास बाळगू नका. वस्तुस्थतीकडे लक्ष ठेवून काम करा. असा सल्लाही यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला.
यावेळी जिल्हा परिषदेने स्वच्छतेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत यांचे अभिनंदन केले तर बापार्डे ग्रामपंचायत सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!