*कोकण Express*
*श्रावणी कंप्युटर्स तळेरे आयोजित श्री गणेश आरास स्पर्धेचा निकाल जाहीर*
*प्रथम क्रमांक धुमकांचा राजा स्पर्धक संजय गंगाराम धुमक (वारगाव धुमकवाडी)*
*कासार्डे; संजय भोसले*
गणेशोत्सवानिमित्ताने श्रावणी आणि मेधांश कम्प्युटर्स आयोजित श्री गणेश आरास स्पर्धेचा निकाल दसऱ्याच्या शुभ दिनी जाहीर करण्यात आला.ही स्पर्धा खुल्या गटासाठी असून या स्पर्धेत एकूण २४ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला होता.आपल्या घरगुती बाप्पाच्या आरासचा व्हिडिओ करून तो फेसबुक पेजवर पोस्ट करून त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक मिळवणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते.या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेते व कवी प्रमोद कोयंडे,पत्रकार संजय खानविलकर तसेच पत्रकार निकेत पावसकर यांनी केले.
फेसबुक पेज वरील पोस्टला असलेले लाईक आणि परीक्षकांचे परीक्षण यांचा सारासार विचार करून प्रथम क्रमांक धुमकांचा राजा स्पर्धक संजय गंगाराम धुमक (वारगाव धुमकवाडी) रुपये पाच हजार चा फ्री क्लिक कोर्स कूपन, आकर्षक सन्मानपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पाताड्यांचा राजा स्पर्धक गुरू पाताडे (कासार्डे तांबळवाडी) रुपये पाच हजार चा फ्री क्लिक कोर्स कूपन, आकर्षक सन्मानपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक करुळकरांचा राजा स्पर्धक उमेश मधुकर मेस्त्री करूळकर (वारगाव वरची सुतारवाडी) रुपये पाच हजार चा फ्री क्लिक कोर्स कूपन, आकर्षक सन्मानपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह यांना देण्यात आला.रुपये पाच हजार चा फ्री क्लिक कोर्स कूपन, आकर्षक सन्मानपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व सहभागी स्पर्धकांना ई सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
सदर गणेशाला स्पर्धेच्या सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे श्रावणी व मेधांश कम्प्युटर्स या केंद्राचे संचालक सतीश मदभावे व सौ.श्रावणी मदभावे यांनी हार्दिक अभिनंदन केले.