शालेय विद्यार्थी अपहरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पेट्रोलिंग वाढवा

शालेय विद्यार्थी अपहरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पेट्रोलिंग वाढवा

*कोकण Express*

*शालेय विद्यार्थी अपहरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पेट्रोलिंग वाढवा*

*मनसेचे बांदा पोलिसांना निवेदन*

*परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याचीही मागणी*

*सावंतवाडी । प्रतिनिधी*

बांदा येथे दोघा अज्ञातांकडून विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रसिद्धी माध्यमातून बातम्या प्रकाशित झाल्यानंतर गावागावात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. शाळा भरणे व सुटण्याच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग करण्यात यावे ग्रामपंचायत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या लेखी आपण सूचना द्याव्यात पोलीस पाटील व स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना द्याव्यात तसेच आपल्या माध्यमातून ग्रामपंचायत व पोलीस पाटलांना कटेखोरपणे आपले आदेश पालन करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेतर्फे बांदा सहा. पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनाही शाळा व शाळेचा संपूर्ण परिसरात शाळा भरते व मधली सुट्टी व शाळा सुटताना मुलांकडे लाक्ष देण्याचा सूचना देण्यात यावे त्याचप्रमाणे पालकांची चिंता कमी होईल व सदर घटनेमुळे भीतीचे वातावरण जे झाले आहे ते कमी होईल या दृष्टीने आपण दक्षता घ्यावी व आपल्या स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करावेत व पेट्रोलिंगची घासत वाढवीत जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच परप्रांतीयांच्या नोंदणी ठेवण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी मनसेचे बांदा विभागअध्यक्ष नाना सावंत, बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक, विष्णू वसकर, प्रविण गवस, ऋषिकेश शिरोडकर आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!