*कोकण Express*
*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ९ ऑक्टोबर ला सिंधुदुर्गात : विविध उपक्रमांचे उद्घाटन*
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ९ ऑक्टोबर ला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते विविध उपक्रमांचे उद्घाटन करणार आहेत. रविवारी सकाळी १० वा. सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित राजवाडा परिसर येथील उषःकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स च्या महा-आरोग्य शिबिराचे उद्घाटन, दुपारी १२ वा. डॉ विद्याधर तायशेट्ये यांचे संजीवनी हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटल ,ठाणे यांच्या संयुक्तविद्यमाने सुरु होणाऱ्या लिव्हर-किडणी-संधीवात टेलिमेडिसिन केंद्राचे संजीवनी हॉस्पिटल , कणकवली येथे उद्घाटन, सायंकाळी ५ वा. माझा वेंगुर्ला, किरात ट्रस्ट आणि अटल प्रतिष्ठान यांना सी.एस.आर अंतर्गत उपलब्ध झालेल्या दोन बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा आणि तळागळातील माणसाला कोविड१९ काळात सेवा पुरवलेल्या सिंधुदुर्गातील २५ डॉक्टर्स, काऊंसिलर्स आणि सिंधुरक्तमित्र यांचा सन्मान मधुसूदन कालेलकर सभागृह,वेंगुर्ले येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाना सर्वांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन समन्वयक डॉ अमेय देसाई यांनी केले आहे.