*कोकण Express*
*सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचे 100 वे महोत्सवी वादन होणार कणकवलीत*
*सिंधुगर्जना ढोलताशा पथकाने अल्पावधीतच १०० वादने यशस्वीरित्या पूर्ण करून रचला नवा किर्तीमान*
एन बी एस चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाच्या स्थापनेनंतर अल्पावधीतच श्री देव स्वयंभू व भालचंद्र महाराजांच्या आशीर्वादाने व जनतेच्या सहकाऱ्याने १०० वादने वादनाचा विक्रम प्रस्थापित केला आहे, अनेक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये व राज्याबाहेर देखील १५० स्त्री पुरुष कलाकारांच्या संचात १०० वादने पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. संस्कृती संवर्धन आणि ढोलताशा परंपरा हे नाते आगळेवेगळे आहे आणि हे काम युवक युवतींनी सन्मापूर्वक राज्यभर पोहचवले, ढोल वादनाबरोबरच सामजिक बांधिलकी म्हणून सर्वधर्मसमभावाचे मूल्य हे पथक नेहमी जोपासते. जिल्यातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांमध्ये सिंधुगर्जना ढोलताशा पथक प्रेक्षकांची मने जिंकत आहे
ढोलवादना बरोबरच पथकामध्ये स्वयंरोजगार, रोजगार शिक्षण, नोकरी,आरोग्य विषयी उपक्रम, मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, कोरोना काळात शेकडो गरजवंताना अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करून सामजिक बांधिलकी जोपासण्याचे काम देखील पथकाने केले आहे काल दिनांक ४ ऑक्टोबर रोजी हरमल गोव्यामध्ये ९९वे वादनाचे सादरीकरण करून १००वे वादन परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या भूमीत कणकवली शहरात करण्यासाठी सिंधुगर्जना पथक स्त्री पुरुष कलाकारांच्या संचात पूर्ण वाद्यसंचासह सज्ज आहे.
शतक महोत्सवी वादनानिमित्त व दसर्याचे औचित्य साधून शुभेच्छांचा व वाद्यपूजनाचा कार्यक्रम आज आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षा सौ.सुरेखा भिसे, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, खजिनदार शुभम पवार, पथकप्रमुख नितीन चव्हाण, उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे, महिलाप्रमुख रिदा मन्सूरी व पथकाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. आणि यावेळी पाहिले वादन कणकवलीत झाले होते व १००वे वादन देखील कणकवली शहरात होत आहे याबद्दल पथकातील सर्व कलाकारांचा सार्थ अभिमान आहे अश्या शुभेच्छा देऊन
प्रा.हरीभाऊ भिसे यांनी अभिनंदन केले. सिंधुदुर्गवासी व समस् कणकवलीकरांनी नेहमीच अपार प्रेम दिले सहकार्य केले यासर्वांचे आम्ही आभारी आहोत असे प्रा. भिसे म्हणाले व दिनांक ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शतकमहोत्सवी वादनाला उपस्थित राहून वादकांना आशीर्वाद द्यावेत असे आवाहन देखील त्यांनी केले