मालवण डेपो मॕनेजरने मांडवली केली; कारवाई करा-अमित इब्रामपूरकर

मालवण डेपो मॕनेजरने मांडवली केली; कारवाई करा-अमित इब्रामपूरकर

*कोकण Express*

*मालवण डेपो मॕनेजरने मांडवली केली; कारवाई करा-अमित इब्रामपूरकर*

*मनसेची एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार*

मालवण येथे एसटी -डंपर यांच्यात झालेल्या अपघाताची चौकशी होण्याबाबत मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार केली असुन मालवण आगार व्यवस्थापकांनी अनधिकृत व्यावसायिकांकडून मांडवली केल्याचा गंभीर आरोप केला आहे.या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की मालवण जिल्हा -सिंधुदुर्ग येथे दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी आनंदव्हाळ येथे रात्री ८.१५ च्या सुमारास एसटी -डंपर यांच्यात अपघात झाला होता.या एसटी बसचा नंबर एमएच-२० बीएल 1659 असा असुन या अपघातात एसटीचे जबर नुकसान झाले.याबाबत मालवण पोलीस स्थानकात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
शासनाच्या नियावालीमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची रीतसर तक्रार स्थानिक पोलीस
स्थानकाला देऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करावा लागतो.परंतु अश्याप्रकाराची कोणतीही हालचाल मालवण आगार
व्यवस्थापकांनी केली नाही.
अपघात झालेला डंपर हा अनधिकृत वाळुशी संबंधित असुन या अनधिकृत वाळु व्यवसायीकांकडून मांडवली
तसेच आर्थिक तडजोड केल्याचा मनसेच्यावतीने आमचा आरोप असुन सदर प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून
मालवण आगार व्यवस्थापकांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी हे पत्र देत आहे.तसेच याची प्रत परिवहन,सचिव मंत्रालय मुंबई,विभाग नियंत्रक ,कणकवली यांच्याकडे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!