कणकवली उपजिल्हा रुग्णालय सर्व शस्त्रक्रिया होण्यासाठी सज्ज

*कोकण Express*

*कणकवली उपजिल्हा रुग्णालय सर्व शस्त्रक्रिया होण्यासाठी सज्ज..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राज्यात आणि जिल्हयात आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असतांना, कोरोना संसर्गाच्या काळात कणकवली उपजिल्हा रुग्णालयाने केलेले काम रुग्णासाठी संजीवनी ठरले आहे. जेव्हा कुठेच शस्त्रक्रिया होत नव्हत्या, तेव्हा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सुमारे पाचशे रुग्णावर अत्यावश्यक सेवा म्हणुन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २,५०० पेक्षा जास्त कोविड रुग्णावर उपचार देऊन बरे करणाऱ्या या उपजिल्हा रुग्णालयाने ३६० रुणांना डायलेसीस करून प्राण वाचविले, आवश्यक वाटल्यास प्रसुती पुर्व सोनोग्राफी करून ४५० महिलांची प्रसुती केली. याशिवाय शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवुन प्रतिदिवशीच्या रुग्ण तपासणीचा २,५०० असा उच्चाकं गाठला. कोरोना काळात सुमारे ५,००० पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेत, दिलेले उपचार ही खरी सेवा होय.

शासकीय रुग्णालय म्हटले की, फार सुविधा मिळतील अशी अपेक्षा कोणीच करत नाही. मात्र, याला अपवाद कणकवली उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. कोरोना काळात जेव्हा सर्वच खाजगी डॉक्टरर्सचे दवाखाने बंद होते, तेव्हा आणि आजही कणकवली उपजिल्हा रुग्णालय प्रभावीपणे काम करत आहे. अनेक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून अनेकांना जीवदान देणाऱ्या या उपजिल्हा रुग्णालयात आजही गलगंड, थायऱ्याड, प्रोस्टेड, लेप्रॉटॉमी, पित्ताशयात होणारे खडे, मुत्र पिंडातील खडे, पोटाच्या शस्त्र क्रिया अशा अवघड शस्त्रक्रिया या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एस.एस.पाटील हे सहकारी डॉक्टर च्या मदतीने करत आहेत.

आजारपणात सर्वाधिक खर्च होतो आणि सामान्य माणसाला तो परवडत नाही. अशा स्थितीत कणकवली शासकीय रुग्णालयात होत असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्र क्रियामुळे सामन्यांना आधार मिळाला आहे. नुकतीच थायऱ्याड आणि हायट्स हर्निया सारखी गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया डॉ.एस. एस.पाटील यांनी केल्या. त्यासाठी डॉ.मनीषा ओगले यांनी रुग्णाला भुल दिली. या शस्त्रक्रिया कोविड असल्याने मुंबईत मोठ्या रुग्णालयांनी करण्यास नकार दिला होता. या पुर्वी पोटातील ट्युमर काढण्यासारखी, तर कधी आतड्यांची गुंतागुंत असलेली शास्त्रक्रिया डॉ.पाटील यांनी यशस्वी करून रुग्णांना जीवदान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!