*कोकण Express*
*गांगेश्वर मित्रमंडळ तर्फे फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धा*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
गांगेश्वर मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त वाडीमर्यादीत फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त खास मुलांसाठी फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच संगीत खुर्ची खेळासाठी लहान मुलांसोबत मोठ्या युवक- युवतींनी सहभाग घेतला.
गांगेश्वर मित्रमंडळाच्या वतीने अत्यंत नीटनेटके आयोजन करून सूत्रबद्धरित्या नवरात्रोत्सव साजरा केला गेला. सर्व स्थानिक नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होत आनंद दर्शवला. या स्पर्धेचे परीक्षण शितल मांजरेकर व चानी जाधव यांनी केले. या कार्याबद्दल सर्व नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले.
या स्पर्धेचे प्रथम अमित जाधव, द्वितीय रोशन जाधव, तृतीय साक्षी थोरात, उत्तेजनार्थ गार्गी कामत व कुणाल मेस्त्री यांनी क्रमांक पटकाविला.
या कार्यक्रमास नगरसेविका माही परुळेकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, रामदास मांजरेकर, चानी जाधव, परेश परब, प्रसन्ना देसाई, शीतल मांजरेकर, योगेश जाधव, तेजस परब, रोशन जाधव, राहुल वालावलकर, अमित जाधव, रोहित सरगर, रोशन जाधव, रोहित जाधव, प्रथमेश जाधव, अक्षय खरात आदी उपस्थित होते.