*कोकण Express*
*फोंडाघाट जुना बाजार येथील
विनायक सावंत यांचे निधन*
कणकवली तालक्यातील फोंडाघाट जुना बाजार येथील चतुरस्त्र व्यक्तिमत्व, नागरीक विनायक सूर्यकांत सावंत (४० वर्ष ) यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यात त्यांचा वावर उठावदार होता. पप्या या नावाने ते परिचित होते.काही काळ त्यांनी पत्रकारितेमध्ये काम पाहिले होते. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ- बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाबद्दल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून, अंत्ययात्रेत सर्व स्तरातील ग्रामस्थ, आप्तेष्ट, मित्रपरिवाराने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.