फोंडाघाट महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन संपन्न

*कोकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन संपन्न*

*प्रामाणिकपणे काम करत गांधीजींच्या तत्त्वांचा जीवनामध्ये अवलंब करा*

*डॉ. विष्णू फुलझेले.*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा व शांति गीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले हे होते.*गांधीजींच्या हिंसेचे तत्व*’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुचिता कदम, दिपाली जाधव, शुभम लाड, आयुष सावंत, अक्षया कदम, प्रेरणा डोंगरे, दीप्ती माशये आणि संगीता शेळके या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या विविध विचारांवर, कार्यावर तसेच त्यांच्या आयुष्यामधून समाजाला दिलेली गेलेली शिकवणूक तसेच तत्त्वज्ञान अशा विविध अंगावर प्रकाश टाकला. सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी अहिंसा व एकात्मता विषयाची शांतता प्रतिज्ञा घेतली.

स्पर्धेनंतर शांतिगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या शांती गीत गायनामध्ये विविध गाणी सादर करण्यात आली. यामध्ये तू बुद्धि दे, हम सब भारतीय है, हीच आमुची प्रेरणा, प्रार्थना रघुपती राघव राजाराम आणि वैष्णव जनतो अश्या मराठी व हिंदी गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला हार्मोनियम साथ सतीश वाळवे यांनी आणि तबला साथ विनायक बागवे यांनी दिली.

अध्यक्षीय भाषणांमध्ये प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले की महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानाचा विचार करून जीवनामध्ये त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करावा. नेहमी प्रामाणिकपणे काम करा. अहिंसेचा मार्ग स्वीकारा. सत्याचा विजय होत असतो. दुसऱ्यांना त्रास होईल असे वर्तन करू नका. त्यामुळे आपल्या जीवनाचा मार्ग सुखकर होईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी सुरवसे यांनी सूत्रसंचालन डॉ. बाजीराव डफळे यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा. क्रांती पाटील आणि प्रा. सनेद्र आचरेकर यांनी केले. तर आभार प्रा. विनोद पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!