दसरा मेळाव्यासाठी कुडाळ मालवण मतदारसंघातील शिवसैनिक मुंबईत जाण्यास सुरुवात

दसरा मेळाव्यासाठी कुडाळ मालवण मतदारसंघातील शिवसैनिक मुंबईत जाण्यास सुरुवात

*कोकण Express*

*दसरा मेळाव्यासाठी कुडाळ मालवण मतदारसंघातील शिवसैनिक मुंबईत जाण्यास सुरुवात*

एक नेता, एक झेंडा, एक मैदान, एकनिष्ठ शिवसैनिकांचा पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळावा उद्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं. ६.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर येथे संपन्न होणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी कुडाळ मालवण मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आजपासून मुंबई येथे जाण्यास सुरुवात झाली आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ रेल्वे स्टेशनवरून जनशताब्दी एक्स्प्रेसने कुडाळ मालवण मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाण्यासाठी रवाना झाले.याप्रसंगी शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो, आदित्य ठाकरे यांचा विजय असो, आमदार वैभव नाईक यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी सुशील चिंदरकर,कृष्णा तेली,सन्मेष परब, तपस्वी मयेकर,दीपक सावंत, शामसुंदर परब, राजन गावडे,सचिन परब, नितीन नाईक, राकेश नाईक,नितीन सावंत,सचिन वायंगणकर,अंतोन फर्नांडिस रमेश कद्रेकर, परेश सादये,अक्षय भोसले हे शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले.किरण शिंदे,राजू गवंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!