नवरात्रौत्सवानिमीत्त कासार्डेत ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

नवरात्रौत्सवानिमीत्त कासार्डेत ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

*कोकण Express*

*नवरात्रौत्सवानिमीत्त कासार्डेत ५१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*कासार्डे;संजय भोसले*

श्री सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या नवरात्रौत्सवा निमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर संपन्न झाले.यावेळी माजी जि.प.सदस्य संजय देसाई याच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये,उपाध्यक्ष अभिजित शेटये, प्रसाद जाधव,राजा सावंत, नितीन मुणगेकर, राजा कल्याणकर, अरूण लाड, निखिल केळवलकर, रोहित आंबेरकर, वसंत आयरे, संदिप केसरकर, राकेश मुणगेकर, राजू शेटये,अजय गायकवाड,आबू मोंडकर यांच्यासह जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

रक्तदान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीरात मंडळाच्या सतराव्या वर्षी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरम्यान वैभववाडी गटविकास अधिकारी श्री जयप्रकाश परब,माजी सरपंच संतोष पारकर, उद्योजक प्रणिल शेट्ये,दारूम सरपंच सुनिंद्र सावंत,नागेश पाळेकर,पोलिस दिपेश कानसे आदींनी भेट दिली. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री. सिध्दविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या सभासदांनी विषेश मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!