*कोकण Express*
*फणसगाव प्रशालेत रानभाज्यांचे प्रदर्शन संपन्न*
*कासार्डे; संजय भोसले*
देवगड तालुक्यातील फणसगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फणसगाव येथे रानभाज्या प्रदर्शन झाले आपल्या परिसरातील विविध उपलब्ध असणाऱ्या रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या हेतू ने हा उपक्रम घेण्यात आला. भाजी हा अन्नघटकातील अत्यावश्यक घटक नियमित आहारात समाविष्ट करून आपले जेवन सात्विक गुणांनी परिपूर्ण असावे. अशी माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा कोरेगावकर यांनी सांगितली परिसरात मिळणाऱ्या आळू,शेवगा, रताळी, टाकला, डेडर, सुरण,तांदळी, हळद, भारंगी,कवळा,कुर्डू,पोकळा, माठ, काटलं,केळफुल,करांदा, कारले, भोपळा, तीळ,मायाळू चूच,नारळ,तीळ आदी भाज्यांचे प्रदर्शन भरवले होते.
सर्व घटकांनी युक्त समतोल आहार सर्वांनी आपल्या जेवनात वापरण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षिका सौ.वर्षदा करंदीकर यांनी केले.
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक उपस्थित होते.