*कोकण Express*
*फिनोलेक्स अॅकॅडमीच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड*
*रत्नागिरी | प्रतिनिधी*
फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या २९ विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इन्फोसिस या नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये फिनोलेक्स अॅकॅडमीच्या कु. भूषण वायंगणकर (इलेक्ट्रिकल), कु. स्वरदा पाध्ये (इलेक्ट्रिकल), कु. विपुल नाईक (मेकॅनिकल), कु. अर्पित सुर्वे (मेकॅनिकल), कु. चिन्मय शेट्ये (मेकॅनिकल), कु. स्नेहांकित चव्हाण (मेकॅनिकल), कु. मानसी खडपे (ईएक्सटीसी), कु. प्राजक्ता कोडाळकर (आय.टी), कु. मयुरेश पालव (मेकॅनिकल), कु. साई शिगवण (मेकॅनिकल), कु. प्रद्युम्न हरिहर (मेकॅनिकल), कु. शुभम शिंदे (मेकॅनिकल), कु. श्रीयोग विचारे (इलेक्ट्रिकल), कु. मुक्ती कांबळे (इलेक्ट्रिकल), कु. वसंत दामले (आयटी), कु. हृतिक संसारे (आयटी), कु. रेहान मजगावकर (केमिकल), कु. तन्वी गुरव (ईएक्सटीसी), कु. मयुरी जंगम (इलेक्ट्रिकल), कु. तेजश्री कांबळे (इलेक्ट्रिकल), कु. रजनीश निर्मळे (इलेक्ट्रिकल), कु. अक्षय डोईफोडे (इलेक्ट्रिकल), कु. अंचल परब (इलेक्ट्रिकल), कु. तुषार पडेलकर (आयटी), कु. मंथन पारधी (आयटी), कु. अभिषेक नाईक (आयटी), कु. हितेश कीर (एम.सी.ए), कु. हासिबा कोतवडेकर (एम.सी.ए), कु. वेदिका पालव (एम.सी.ए) या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे.
कु. भूषण प्रमोद वायंगणकर ह्याची कंपनीने स्पेशालिस्ट प्रोग्रामर ह्या पदासाठी निवड केली असून त्याला वार्षिक ९.५ लाखाचे सॅलरी पॅकेज देऊ केले आहे.
या निवड प्रक्रियेमध्ये बुद्धिमत्ता परीक्षा, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्यू या चाचण्यांचा समावेश होता. फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नियमितपणे अॅप्टीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूचे ट्रेनिंग दिले जाते. ह्या सर्व प्रयत्नांमुळेच महाविद्यालयाला प्लेसमेंटमध्ये हे घवघवीत यश प्राप्त होत आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयची निवड हि प्लेसमेंटचा निकष समोर ठेवूनच केली जाते. त्याच प्लेसमेंट निकषांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच वर्ष २०२२-२३ मधील जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात ॲकॅडमीमधील ५० हुन अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
मागील शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये अॅकॅडमीमधील ३३५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे फिनोलेक्स ॲकॅडमीने प्लेसमेंटचा चढता आलेख मागील ५ वर्षे कायम राखला आहे. मागील पाचही वर्षे ८०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी निर्माण करून देण्यामध्ये महाविद्यालय यशस्वी ठरले आहे.
ह्या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि ॲकॅडमीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.