*कोकण Express*
*पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा चे औचित्य साधून भाजपा च्या वतीने खानोली गावामध्ये मुलांना शालेय वस्तूचे वाटप*
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या तर्फे खानोली गावातील जिवन शिक्षण शाळा खानोली नं – १ व खानोली नं -२ या दोन शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले .
यावेळी शरदजी चव्हाण यांनी *राष्ट्रनेता* नरेंद्रभाई मोदी व *राष्ट्रपिता* महात्मा गांधी यांचा जिवनप्रवास विद्यार्थ्यांना सांगीतला व त्याप्रमाणे नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी असा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला .
यावेळी आंबेसवाडी शाळेसाठी विनामोबदला जागा देणारया कुटुंबातील श्री.बापु खाडे यांचा सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण , सौ . चव्हाण , महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सौ.स्मिता दामले , खानोली सरपंच सौ.प्रणाली खानोलकर , उपसरपंच सुभाष खानोलकर , माजी सरपंच महेश खानोलकर , दिंव्याग आघाडी चे सुनील घाग , डाॅ. आजगांवकर , बुथप्रमुख बाळु खानोलकर , ओंकार चव्हाण , जतीन आवळेगांवकर , शिक्षिका सौ.सडवेलकर , सौ.ताडे , सौ.रेडकर , शिक्षक श्री.भोई व विद्यार्थी , पालक व ग्रामस्थ उपस्थित होते .