*कोकण Express*
*खारेपाटण महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा वन अभ्यास दौरा संपन्न*
*खारेपाटण ःःप्रतिनिधी*
जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने एकदिवसीय वन अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
निसर्गरम्य परिसरा मध्ये पावसाळी हंगामात आढळणाऱ्या विविध वनस्पतींची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
वनस्पती ओळखणे, दुर्मिळ-औषधी वनस्पतीचे वैशिष्ट्ये जाणणे, प्रदेश निष्ठ वनस्पतीची गुणधर्म व त्यांचे संवर्धन या संदर्भात माहिती देणे . वनस्पती आणि नैसर्गिक परिसंस्था यांच्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे लायकेन्स जिथे प्रदूषण नाही अशा ठिकाणी त्यांचे अस्तित्व असते व ते प्रदुषण मुक्त पर्यावरणाचे नैसर्गिक सूचक आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण जंगल व धरण परिसरात वनस्पतीशास्त्र विभागाकडुन देवगड तालुक्यातील कुणकवण येथे विद्यार्थ्यांना नेण्यात आले. या अभ्यासदौऱ्या मध्ये विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
या प्रसंगी विभाग प्रमुख सहा.प्रा.प्रज्योत नलावडे, सहा.प्रा. प्रतिक नाटेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विज्ञान विभाग प्रमुख सहा. प्रा सागर इंदप, सहा.प्रा.रुची तेली, सहा.प्रा.शार्मीन काझी आदी उपस्थित होते.
हा अभ्यासदौरा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास मन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी श्री.वसीम सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.
या अभ्यास दौऱ्याचे नियोजन वनस्पतीशास्त्र विभागाकडून करण्यात आले.