*कोकण Express*
*९ ऑक्टोबर ला होणार टेलिमेडिसिन सेंटर चे लोकार्पण!*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली येथील डॉ विद्याधर तायशेट्ये यांच्या हॉस्पिटलमध्ये ९ ऑक्टोबर २०२२ रविवारी दुपारी १२ वाजता एका अद्ययावत टेलिमेडिसिन सेंटरचे लोकार्पण होणार आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यातील सामान्य माणसाला ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल च्या निष्णात, तज्ञ सुपरस्पेशालिष्ट डॉक्टरांचे माफक दरात उपचार मिळणार आहेत. विशेष म्हणजे कोकणचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू ह्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटलची डॉ निवृत्ती हसे आणि डॉ अनिकेत हसे – नेफ्रोलॉजी(किडनी चे विकार), डॉ पारिजात गुप्ते – हिपेटोलॉजी (लिव्हर) , डॉ योगिता पेंडूरकर – रुमेटोलॉजी (संधीवात) , डॉ मुक्ता बापट – गॅसट्रोइन्टेरोलॉजी (अन्ननलिका, जठर,आतडे) या शाखेचे निष्णात डॉक्टर तसेच ज्युपिटर हॉस्पिटलच्या ग्रुप चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ शिल्पा ताटके तसेच क्लिनिकल मेडिसिन चे डायरेक्टर तथा असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ अमित सराफ हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थितीत राहणार आहेत. तसेच पुढील सहा महिन्यात माफक दरात सेवा पुरवणारे एक अद्ययावत डायलिसिस सेंटर आणि एक ब्लड स्टोरेज सेंटर सुद्दा कार्यान्वित करणार असल्याची माहिती दिली. ९ ऑक्टोबर च्या सोहळ्याला सर्व कणकवलीकर नागरिकांनी उपस्थितीत रहावे असे आव्हान करण्यात आले.