भाजपा संगमेश्वर व कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा समारोह संपन्न

भाजपा संगमेश्वर व कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा समारोह संपन्न

*कोकण Express*

*भाजपा संगमेश्वर व कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा समारोह संपन्न*

*संगमेश्वर ःःप्रतिनिधी* 

तालुक्यातील कोळंबे विद्या प्रसारक मंडळाच्या गुरुकुल वसतिगृह सभागृहात आज रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कार्यक्रमाचा समाप्ती समारोह संपन्न झाला.

भाजपा प्रदेश सचिव मा. प्रमोद जठार यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत विद्यार्थ्यांनी स्वागत केले. ग्रंथप्रदर्शन व त्यानंतर मा. मोदीजींच्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन झाले. मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, विद्यादेवी सरस्वती, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. कार्यक्रमाचे संयोजक अनिल घोसाळकर यांनी श्री. प्रमोद जठार यांना राममंदिराची प्रतिमा भेट दिली. अतिथींची ओळख व सूत्रसंचालन प्रा. सौ. सानिका मुळ्ये यांनी केले. ईशस्तवन, स्वागतपद्य व स्वागताची औपचारिकता पार पडल्यावर श्री. योगेश मुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शालेय विद्यार्थ्यांची भाषणे व कविता वाचन झाले. शाळेतील सहशिक्षक श्री. टी. जे. शिंदे यांनी शिक्षकांचे मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. नयनभाऊ मुळ्ये यांनी आपल्या मनोगतातून आपण सर्वच मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहोत याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.

श्री. देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून मोदीजींचे कार्य विषद केले. प्रमोद जठार यांनी शाळेत नव्याने सुरू झालेल्या वसतिगृहास तात्काळ १ लाख रूपयांची मदत देऊ केली. तर १० संगणक संच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणातून वाचनाचे महत्त्व विषद केले. गरिबीला आपली कमजोरी समजण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करा व त्यासाठी जास्तीतजास्त अभ्यास करा असा मोलाचा संदेश दिला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय मुळ्ये यांनी आभारप्रदर्शन केले. तर प्रा. श्री. संदीप मुळ्ये यांनी संपूर्ण वंदे मातरम म्हणुन कार्यक्रमाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!