डंपर व एसटी यांच्यात झालेला भीषण अपघात वाळूव्यवसायिकांच्या दबावामुळेच मिटवला

डंपर व एसटी यांच्यात झालेला भीषण अपघात वाळूव्यवसायिकांच्या दबावामुळेच मिटवला

*कोकण Express*

*डंपर व एसटी यांच्यात झालेला भीषण अपघात वाळूव्यवसायिकांच्या दबावामुळेच मिटवला*

*गुन्हा दाखल करा अन्यथा मनसे एसटीच्या एमडीकडे तक्रार करणार*

*मालवण ः प्रतिनिधी*

शनिवारी संध्याकाळी आनंदव्हाळ येथे डंपर-एसटी यांच्यात अपघात झाला. मात्र डंपरच्या धडकेने एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डंपर मालकाने एसटीचे झालेले नुकसान भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले अशी माहिती मालवण एसटी आगार व्यवस्थापक यांनी दिली.

एसटीच्या नियमावली मध्ये जर एसटी बसचे अपघातामुळे नुकसान झाले तर त्याची तक्रार पोलीस स्थानकाला देऊन पंचनामा करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा लागतो. परंतु मालवण आगार व्यवस्थापकांनी अशा प्रकारच्या हालचाली न करता वाळू व्यवसायिकांच्या दबावाखाली प्रकरण दडपले. सत्तेत असलेल्या बड्या राजकीय नेत्याच्या फोनाफोनीमुळे प्रकरण दाबल्याची चर्चा आहे. हा फोनाफोनी करणारा बडा राजकीय नेता कोण? एसटीचे झालेले नुकसान कोणी ठरवले? आगारव्यवस्थापकांना स्वतः व्हॕल्युएशन करण्याचा अधिकार आहे का? सदर अपघात झाल्यानंतर पोलिस अधिकारी उपस्थित काही वाळु व्यावसायिकांचे प्रतिनीधी उपस्थित राहुन दुचाकींना रस्ता मोकळा करुन देत होते तसेच डंपरचे पासिंग परराज्यातील असुन पोलिस यंत्रणा मुग गिळुन गप्प का? सदर अपघातग्रस्त झालेली एसटी मालवण आगारात असून आज रात्रीच्या वेळी त्या एसटीची मालवण शहरात किंवा अन्य तालुक्यात नेऊन डागडूजी करण्याची शक्यता आहे.

मनसेकडे अपघातग्रस्त एसटीचे फोटो असुन जर एसटी प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास मनसेच्यावतीने एसटीच्या एमडींकडे तक्रार करणार असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!