राज्य कर्मचार्‍यांना मिळणार कोविडवरील खर्चाची प्रतिपूर्ती

राज्य कर्मचार्‍यांना मिळणार कोविडवरील खर्चाची प्रतिपूर्ती

*कोकण Express*

*राज्य कर्मचार्‍यांना मिळणार कोविडवरील खर्चाची प्रतिपूर्ती*

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड 19 आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.

शासकीयअधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसचं गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते.

राज्य शासनानं मार्च 2005 मध्ये जाहीर केलेल्या शासन निर्णयात 27 आकस्मिक आणि 5 गंभीर आजार निश्चित केले आहेत. त्यात हृदय आणि फुफ्फुसाशी निगडित आजारांचा समावेश असला तरी कोरोनाबाबतच्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाबाबत प्रतिपूर्तीत स्पष्टता आणण्यासाठी या आजाराचा समावेश करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!