*कोकण Express*
*वंचितांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी उमेद फौंडेशनकडून एक पणती वंचितांच्या दारी उपक्रमाचे आयोजन*
*कासार्डे; संजय भोसले*
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबे आणि वृद्धाश्रम, अनाथ आश्रम मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी उमेद फौंडेशनने याही वर्षी एक पणती वंचितांच्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्यावर्षी उमेद फाउंडेशन च्या वतीने शंभर गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला होता.
उमेद फा फौंडेशनच्या वतीने या वंचित घटकांना कपडे, पणत्या,आकाश कंदील, दिवाळी फराळ देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की आपणही या उपक्रमात आपला मोलाचा हातभार लावावा.या उपक्रमात सहभागी होतानाआपल्याला जर नवी/जुनी कपडे द्यावयाची असतील तर आपण कृपया शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर या तारखेपर्यंत उमेद फाऊंडेशन सदस्यांकडे पोहोच करावीत आपल्याला स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ /पणत्या/ आकाशकंदील असे दिवाळी उपयुक्त साहित्य द्यावयाचे असल्यास आपण उमेद फाउंडेशन कडे दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत पोहोच करावे.
फराळासाठी आर्थिक मदत आपण ऑनलाइन स्वरूपात/ रोख स्वरूपात केव्हाही उमेद फाउंडेशनकडे अकाउंट वर जमा करू शकता.
आर्थिक मदत एका कुटुंबासाठी फराळ ३०० रू. ,
दोन कुटुंबासाठी फराळ ६०० रू
या टप्प्यात स्वीकारली जाईल
जमा झालेल्या ३०० रु. मदतीतून खालील प्रकारे १ किट बनविण्यात येईल.अंघोळीचा साबण, सुगंधी तेल, उटणे, आकाश कंदील , पणत्या, लाडू (250 ग्रॅम) चिवडा(500ग्रॅम) शंकरपाळी (250 ग्रॅम), चकली ( 250 ग्रॅम ) इ. आपण दिलेली मदत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित कुटुंबे, जिल्ह्यातील वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम येथे वितरित केली जाणार आहे आपली रक्कम A/C name =UMED FOUNDATION A/C Number- 636701000890 बँक नाव -ICICI BANK IFSC Code =ICIC0006367Google pay/Phone pay 9922633365 या खात्यावर जमा करू शकता.
वंचितांची दिवाळी तेजोमय करणेसाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन उमेद फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.