*कोकण Express*
*किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांना वाढदिवसाच्या कणकवलीतील कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा*
*सिंधुदुर्ग*
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्याशेठ सामंत हे आगामी लोकसभा निवडणुकीत लोकसभेचे उमेदवार असतील अशी बातमी प्रसिद्ध होताच किरण सामंत यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाची भावना आहे. आज रत्नागिरी येथे किरण सामंत यांची कणकवली येथील शिवसैनिक सुनील पारकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, शेखर राणे, जानवली सोसायटी चेअरमन दामू सावंत, शरद वायंगणकर यांनी रत्नागिरी येथे भेट घेत लोकसभा उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या. विकासाची दूरदृष्टी आणि समयोचित तात्काळ निर्णय घेणारे व्यक्तिमत्व म्हणून किरण सामंत यांची ओळख आहे. राजकारणात प्रत्यक्ष नसतानाही पडद्यामागची सूत्रे हलविणारा राजकीय चाणक्य बुद्धीचा सूत्रधार म्हणून किरण सामंत यांची राजकीय पटलावर ओळख आहे. असे व्यक्तिमत्व खासदार म्हणून लाभल्यास सर्वसामान्य जनतेची अडलेली विकासकामे तात्काळ मार्गी लागतील.सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्याचा विकासाचा वेग दुप्पटीने वाढेल, त्यामुळे किरण सामंत हे खासदार व्हावेत अशा शब्दांत किरण सामंत यांना कणकवलीतील सुनील पारकर, भूषण परुळेकर, शेखर राणे, दामू सावंत, शरद वायंगणकर या शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या.