*कोकण Express*
*कणकवलीत झळकले शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे फलक*
*आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिलेदार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना दसरा मेळाव्यावरून सध्या राज्यात ठाकरे आणि शिंदे गटात घमासान सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या बिकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा बॅनर आज कणकवली येथील शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती शाखेजवळ झळकला. शिवसेना शिंदे गटाचे प्रस्थ दिवसेंदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत आहे. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्यानिमित्त प्रथमच शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. बांद्रा मुंबई येथील बिकेसी मैदानावर हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटायला या असे आवाहन या बॅनर मधून शिवसैनिकांना करण्यात आले असून जिल्ह्यातून 2 हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार असल्याचे शिंदे गटाचे नेते माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी याआधीच सांगितले आहे

