*कोकण Express*
*सेवा पंधरवड्यानिमित्त आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी आणि आगोम औषधालय यांनी कोळथरे समुद्र किनारा स्वच्छता अभियान राबविले*
*दापोली ःःप्रतिनिधी*
आज आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर कोळथरे शाळेचे विद्यार्थी आणि आगोम औषधालय यांनी कोळथरे समुद्र किनारा स्वच्छता अभियान राबविले. विद्यार्थी शिक्षक कर्मचारी संचालक सर्वांनी उत्साहाने सम्पूर्ण किनारा स्वच्छ केला.
आपले लाडके पंतप्रधान मा.मोदींजींच्या आवाहनाला साद देत सेवा पंधरवड्यानिमित्त हे अभियान राबविण्यात आले.
या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि प्लॅस्टिक वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .
जमा केलेल्या कचऱ्याचे काय करावे हाच मोठा प्रश्न असतो .चिपळूण च्या सहयाद्री निसर्ग मित्र या संस्थेने या विषयावर गेले काही वर्षे उत्तम काम केले आहे .आजच्या या अभियानात निसर्ग मित्र संस्थेची मोलाची साथ लाभली .सर्व कचरा चिपळूण ला नेऊन त्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्याची जबाबदारी निसर्ग मित्र संस्थेने उचलली आहे .
निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी ची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन सेवा कार्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली .अभियान यशस्वी केल्याबद्दल श्री दीपक महाजन यांनी सर्वांचे आभार मानले आहेत .