*कोकण Express*
*वाढ आणि विकास सर्वसामान्य तऱ्हेने होण्यासाठी सुयोग्य पोषण आवश्यक ; मंगल परब*
*खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून पोषण माह संकल्पनाधिष्ठीत जनजागृतीपर अभिमुखताचे विविध उपक्रम संपन्न*
महिला आणि बाल विकास मंत्रालय, आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या निर्देशनानुसार खारेपाटण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या स्वयंसेवकांनी १ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण माह संकल्पनाधिष्ठीत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व विद्यार्थी कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह संकल्पनाधिष्ठीत अभिमुखताचे आयोजन करण्यात आले.
वाढ आणि विकास सर्वसामान्य तऱ्हेने होण्यासाठी सुयोग्य पोषण आवश्यक आहे असे प्रतिपादन श्रीमती मंगल परब यांनी केले. तसेच आहार आणि आजार यांचा घनिष्ठ संबंध असतो. ठराविक कालावधीत शारीरिक व मानसिक वाढ व विकास हि आवश्यक आहे या बाबत मार्गदर्शन केले.
चुकीच्या आहाराच्या प्रत्यक्ष परिणामापेक्षा त्याचे समाजातील अप्रत्यक्ष परिणामच जास्त धोकादायक ठरतात असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी अध्यक्षीय वक्तव्यातुु केले.
पोषण आहार हा फक्त बालकांसाठी नव्हे तर प्रत्येक वयातील निकडीची गरज आहे.तसेे अयोग्य आहारामुळे व्यक्तिच्या बौद्धिक क्षमतेवर तसेच आकलन शक्ती व वर्तनावर विपरीत परिणाम होतो.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे, सहा. प्रा. प्रकाश शिंदे, विद्यार्थी कल्याण समिती प्रमुख सहा. प्रा. प्रज्योत नलावडे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष जिल्हा समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयाचे कर्मचारी समन्वयक श्री.वसीम सय्यद. सहा. प्रा. रूची तेली, विद्यार्थी प्रतिनिधी अदिती भालेकर व गुरुनाथ भोसले
आदी विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.वसीम सय्यद, पाहुण्यांची ओळख कु.अदिती भालेकर, आभार प्रदर्शन कु.गुरुनाथ भोसले व सुत्रसंचालन सहा. प्रा. प्रकाश शिंदे यांनी केले