*कोकण Express*
*खारेपाटण महाविद्यलयाच्या रा. से. यो. कक्ष स्वयंसेवक कु.अरुणा कोकाटे व कु.तुषार जाधव यांना वर्ष २०२१-२२ विद्यापीठ स्तरावरील पुरस्कार प्रदान*
*खारेपाटण महाविद्यलयाच्या रा. से. यो. कक्षाला पून्हा विद्यापीठ स्तरावरील पुरस्कार जाहीर*
जिल्ह्य़ातील खारेपाटण महाविद्यालयातील दोन रा.से.यो. कक्ष स्वयंसेवकांना विद्यापीठ स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार २०२०-२१ ने गौरवण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे स्वयंसेवक म्हणून विविध उपक्रम आणि प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.सुहास पेडणेकर यांच्या हस्ते शिक्षण दिनाचे औचित्य साधून मुंबईत त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातली रा.से.यो.कक्ष स्वयंसेवक अरुणा कोकाटे व तुषार जाधव यांनी सरकार, विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या निर्देशनानुसार सरकाच्या कल्याणकारी अनेेक योजना, पर्यावरण संवर्धन, रक्तदान, आरोग्य व स्वास्थ्य, अवयवदान, रस्ता सुरक्षा, पल्स पोलीओ, साथीचे रोग व महामारी, फिट इंडीया, प्रधान मंत्री जनधन योजना, उज्वला योजना, डिजीटल साक्षरता, कैशलेस भारत एस.बी.एस.आय.पी., सेंद्रिय शेती, बेटी बचाओ, इ.बी.एस.बी, पोशन आहार, व्यसन मुक्ती, एच.आय.व्ही.एड्स., हरीत ग्राम, पूरग्रस्त लोकांना आर्थिक व आर्थिकेतर मदत कौशल्यविकास, तंबाखू मुक्त अभियान, महिला सक्षमीकरणाच्या योजना, रोजगार कारकीर्द जल बचत, प्लास्टिक मुक्त भारत अशा योजनांबाबत दत्तक घेतलेल्या गावात प्रचार आणि जनजागृती केली आहे.
या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.सुहास पेडणेकर, कुलसचिव प्रा.डॉ.रविंद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.शैलेंद्र देवळाणकर, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष संचालक प्रा.डॉ.सुधीर पुराणीक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कार्यक्रम अधिकारी प्रा.रमेश देवकर, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष एस.ओ.डी. प्रा.डॉ.सुशील शिंदे आदी विद्यापीठाचे अधिकारी, पदाधिकारी व इतर प्रतिष्ठित व मान्यवर उपस्थित होते.
ह्या सन्मानासाठी स्वत: संबंधित पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक जबाबदार असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीणशेठ लोकरे करत त्यांच्या सह इतर संस्था सभासदांनी ही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यापीठ स्तरावरील पुरस्कारासाठी पून्हा एकदा या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सन्मानित करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टिकोनातून केल्या गेलेल्या कामाची ही पोचपावती असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्यात. तसेच केंद्रसरकार व राज्यसरकारच्या मुलभूत योजनांचा राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या माध्यामातून प्रचार व प्रसार करण्यासाठी केल्याबद्दलचा हा सन्मान असे प्रतिपादन विद्यापीठाचे एन.एस.एस. जिल्हा समन्वयक तथा महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी श्री.वसीम सय्यद यांनी केले.
या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल अरुणा व तुषार यांनी विद्यापीठ, प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आदींचे आभार व्यक्त केले.