*कोकण Express*
*रक्तदान शिबीरासारखे सामाजिक कार्यक्रम आयोजित करुन मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी*
*नवदुर्गा युवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद- डॉ. पद्ममश्री हळदणकर*
सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये गरबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमासोबत रक्तदान शिबीरासारखे सामाजिक उपक्रम राबवुन नवदुर्गा युवा मंडळ समाज सेवेचा आदर्श निर्माण करीत हे निश्चितचं कौतुकास्पद आहे असे गौरवोद्वार जिल्हा रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. पद्ममश्री हळदणकर यांनी सार्वजनिक नवरात्र उत्सव निम्मित नवदुर्गा युवा मंडळाने नवीन कुर्ली येथील आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीर कार्यक्रम उद्घाटनवेळी काढले.
कार्यक्रम उद्घाटनवेळी फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे यांनी नवदुर्गा युवा मंडळाने सार्वजनिक नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रमात रक्तदान शिबीर उपक्रम राबवुन यशस्वी नियोजन केले, मंडळाचे रक्तदान शिबीर व अन्य सामाजिक उपक्रम निश्चितचं कौतुकास्पद व समाजशील असून मंडळाने भविष्यात युवा पिढीच्या माध्यमातून असे उपक्रम राबवावे आपले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणुन नेहमीच सहकार्य असेल, अशी ग्वाही दिली.
तर लोरे सरंपच अजय रावराणे यांनी कार्यक्रम उद्घाटनवेळी ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असून आपल्या रक्त दानाने कुणा व्यक्तीचे प्राण वाचत असतात, म्हणजेचं आपण केलेल्या रक्तदानाने मानवास जीवदान देत असतो, म्हणूनचं रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबवणं नेहमीच अवघड आहे, त्याकरीता कुशल संघटन आणि जनसंपर्क असणं आवश्यक आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मंडळाचे नेहमीचं कौतुक करतो. असे समाजोपयोगी उपक्रम आपण सतत राबवत रहावे, आपले नेहमीच सहकार्य असेल असे प्रतिपादन केले.
या रक्तदान शिबीर कार्यक्रम उद्घाटनवेळी जिल्हा रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. पद्ममश्री हळदणकर, फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे, लोरे सरपंच अजय रावराणे, फोंडाघाट ग्रामविकास अधिकारी विकास कोलते, जिल्हा रक्तपेढी विभाग सिंधुदुर्ग कर्मचारी श्रीम. प्रांजली परब, मयुरी शिंदे, सुनिल वारोळे,सुरेश डोंगरे वैद्यकिय समाजसेवक, नितीन गावकर, दिपक भाटवडेकर आदी तसेच डॉ. संचित खटावकर, श्रीम. खटावकर मॅडम, सुनिल रावराणे युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी, उपाध्यक्ष दिपक शिंदे,सल्लागार अरुण पिळणकर अमित दळवी, प्रदीप आग्रे, विजय आग्रे, सचिन साळसकर, मंगेश मडवी, सुहास साळसकर, अतुल डऊर, तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते,उपाध्यक्ष सुरज तावडे, सचिव धीरज हुंबे, राजेंद्र तेली,शिवराम पोवार ,चंद्रकांत तेली, अंकुश दळवी,कृष्णा परब, अनंत चव्हाण, प्रकाश भोगले, मधुकर परब, विश्वास भोगले,नंदकुमार राणे, गणेश तेली आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे सदस्य, गावातील ग्रामस्थ यांनी ३३ रक्तदात्यांनी रक्त संकलन करुन शिबीर यशस्वी करण्यास सहकार्य केले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व आभार धीरज हुंबे सर यांनी केले.