राज्यस्तरीय एकता काव्य लेखन स्पर्धेत

राज्यस्तरीय एकता काव्य लेखन स्पर्धेत

*कोकण Express*

*राज्यस्तरीय एकता काव्य लेखन स्पर्धेत*

*कवी सफरअली इसफ प्रथम तर कवी किशोर कदम द्वितीय*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेली ३४ वर्ष मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या एकता कल्चरल
अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या
गणपत गुणाजी जाधव
राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत
मूळचे तिथवली येथील आणि सध्या सोलापूर येथे कार्यरत असलेले कवी सफर अली इसफ यांनी २०२१ – २२ वर्षाचा सर्वोत्कृष्ट कवितेचा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय पारितोषिक कलमठ येथील कवी किशोर कदम यांनी प्राप्त केले असल्याची माहिती एकता
कल्चरचे अध्यक्ष प्रकाश जाधव,
उपाध्यक्ष उज्जय आंबेकर आणि सचिव प्रकाश पाटील यांनी दिली.
सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक – सफर अली इसफ – तिथवली- (देशभक्तीचे जोखड खांद्यावर घेत वंशावळ शोधतोय),दुसरा क्रमांक (विभागून) – ईशान संगमनेरकर – कांदिवली-(गोष्ट हरवलेल्या देशाची )- किशोर कदम – कलमठ- (बुजगावणी),तिसरा क्रमांक (विभागून) – सुधाकर कांबळी – कल्याण- (घोट दुःखाचे पिऊनी),सोनाली जाधव -अहिरे – कल्याण (प्रवास)
उत्तेजनार्थ पारितोषिक- जगदीश राऊत – नागपूर (आई ),शुभांगी थोटम – नवी मुंबई (मुकरुंदन),रवींद्र जाधव – लांजा – ( फक्त तुझ्यासाठी), मेघा गोळे – महाड – (आहेस कोणत्या तू गावी),संजय भोईर – पालघर (मानसिकता), शरद गाडगीळ मुंबई – (झोपडी), मायकललोपीस – वसई (बाप आमचा आम्हाला कळलाच नाही.)
स्पर्धेत महाराष्ट्रातल्या ७०कवीनी सहभाग घेतला होता.डिसेंबर दरम्यान मुंबई गिरगाव साहित्य संघात होणाऱ्या34 व्या एकता संस्कृतिक महोत्सवात विजेत्या कवींना गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!