*कोकण Express*
*▪️केंद्र सरकारची मोठी घोषणा! दोन वर्षात भारत टोलनाका मुक्त होणार – जाणून घ्या महत्वाचे अपडेट*
▪️ देशभरात वाहनांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार
▪️ येणाऱ्या दोन वर्षात भारताला टोल नाकामुक्त करण्यात येणार आहे ,त्यासाठी सरकार ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम आनण्याचा निर्णय घेतला आहे
▪️ *पहा काय म्हणाले नितिन गडकरी*
● केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले आपण GPS सिस्टम फायनलाईज्ड करणार आहोत – त्यानुसार येत्या दोन वर्षात वाहनांचा टोल केवळ लिंक्ड बँक खात्यातूनच वसुल केला जाईल
● तसेच यानंतर वाहनधारकांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज पडणार नाही , तसेच देशातील सर्व नवे ,जूने वाहने जीपीएस सिस्टमशी जोडले जातील
● आता या जीपीएस यंत्रणेने या वाहनांनी किती अंतर पार केले आहे, याचे मोजमाप करुन आपोआप टोलची रक्कम वसूल केली जाईल , असे त्यांनी सांगितले
● सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले , यामुळे देशातील महामार्गांवर पुढील दोन वर्षात कोणताही टोलनाका नसेल, दरम्यान याविषयी आणखी माहिती आली तर ती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू