*कोकण Express*
*पंतप्रधान मोदींच्या जीवनचरीत्रावरील चित्रप्रदर्शनाचे केंद्रीयमंत्री राणेंच्या हस्ते उदघाटन समारंभ संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
17 सप्टेंबर पासून देशभरात सेवा पंधरवडा सप्ताह साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे जीवनचरित्र या चित्रप्रदर्शनातुन मांडण्यात आले आहे.या चित्रप्ररदर्शनाची एक पुस्तिका करून ती शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी, तसेच समाजातील सर्व घटकांना वाटप करा अशी सूचनाही केंद्रीयमंत्री राणे यांनी केली. केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेला ज्ञात कराव्यात, गरिबांना मदत करावी या हेतूने देशात सेवा पंधरवडा साजरा होत आहे.भारत मातेला समर्पित सुपुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रकहानी दर्शविणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही मंत्री राणे म्हणाले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जि प अध्यक्षा संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे, नगराध्यक्ष समिर नलावडे, माजी सभापती मनोज रावराणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राजन चिके, बांधकाम सभापती विराज भोसले,आरोग्य सभापती संजय कामतेकर, बबलू सावंत, अण्णा कोदे, मेघा गांगण, सर्व नगरसेवक, राजश्री धुमाळे, संदीप मेस्त्री, माजी सभापती प्रकाश सावंत, मंगेश तळगावकर, गणेश तळगावकर, महेश शिरवलकर, पंढरी शिरवलकर, आनंद घाडीगांवकर, सुभाष मालंडकर, संदीप सावंत, विजय चिंदरकर, विजय इंगळे, स्वप्नील चिंदरकर, पंढरी वायंगणकर, प्राची कर्पे, पूजा सदडेकर आदी उपस्थित होते.