फोंडा हायस्कूलचा विद्यार्थी ओंकार हुले च्या प्रामाणिकपणाचे होतंय कौतुक

फोंडा हायस्कूलचा विद्यार्थी ओंकार हुले च्या प्रामाणिकपणाचे होतंय कौतुक

*कोकण Express*

*फोंडा हायस्कूलचा विद्यार्थी ओंकार हुले च्या प्रामाणिकपणाचे होतंय कौतुक…*

*ओंकारने सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे केला परत…*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*कोकण Express*

*फोंडा हायस्कूलचा विद्यार्थी ओंकार हुले च्या प्रामाणिकपणाचे होतंय कौतुक…*

 

*ओंकारने सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे केला परत…*

 

*फोंडाघाट ः प्रतिनिधी

इंग्लिश स्कूल फोंडाघाट हायस्कूल रस्त्यावर पडलेला ३५ ते ४० हजाराच्या किमतीचा मोबाईल, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट मध्ये इयत्ता १०वी मध्ये शिकणारा विद्यार्थी, ओंकार अर्जुन हुले याला सापडल्यानंतर,त्याने आपल्यातील प्रामाणिकतेचे दर्शन घडविले. सदर फोन त्यांनी मुख्याध्यापक एस.ए सावंत यांच्याकडे आणून दिला. मध्यंतरीच्या काळात त्या रस्त्यावर कामानिमित्त फिरणाऱ्या राजापूर येथील संतोष कुसवेकर, आपला हरवलेला मोबाईल शोधत असताना त्यांना एका विद्यार्थ्याला फोन मिळाल्याचे कळले. हायस्कूलमध्ये त्यांनी चौकशी केल्यावर ओळख पटवून मुख्याध्यापक यांनी पारकरसर आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत कुसवेकर यांना त्यांचा हरवलेला किमती फोन सुपूर्त केला.

कुसवेकर यांनी शिक्षकांसमवेत ओंकारच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्याला रोख बक्षीसही देण्याचा प्रयत्न केला. मात्र ओंकार ने सदर बक्षीस रक्कम विनम्रपणे नाकारून — “मी माझे कर्तव्य केले” असे सांगितले. त्यामुळे अधिकच, कुसवेकर आणि शिक्षकांनी ओंकरचा गौरव करताना,त्याच्या प्रामाणिकपणाचा सार्थ अभिमान विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

ओंकार हा गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून त्याचे वडील रोजंदारीवर गवंडी काम करतात. आई नसल्यामुळे घरची परिस्थिती बेताची आहे. आपल्या जबाबदारीची जाण असल्याने ओंकारच्या प्रामाणिकपणाबद्दल पालकवर्गातूनही समाधान आणि कौतुकाची भावना व्यक्त होत आहे. प्रशालेच्या संचालकांनीही ओंकारचे गौरव केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!