*अवैध धंद्यांवर कारवाई करा*

*अवैध धंद्यांवर कारवाई करा*

*कोकण Express*

*अवैध धंद्यांवर कारवाई करा*

*मनसेकडून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन*

*कणकवली / प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग मध्ये कित्येक दिवस गोवा बनावटीची दारू, जुगार, वेशाव्यवसाय अमली पदार्थ या धंद्यांना उत आला आहे. पोलिसांचा कोणत्याही स्वरूपाचा धाक राहिलेला नाही, कुंपणच शेत खाते का ? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडलेला आहे. आज अनेक तरुण मंडळी या अमली पदार्थ व दारू गुटख्याच्या, जुगाराच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागले असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे
याबाबतचे निवेदन उपविभागिय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांना देण्यात आले. यावेळी श्री. मेस्त्री यांच्यासोबत निलेश मेस्त्री, धनराज गोरे, समीर सावंत, सचिन सावंत, प्रदीप पराडकर, सुजल कदम उपस्थित होते.
या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी गुन्हेगारी मार्गाकडे वळून उद्भवस्थ होताना दिसत आहेत. याचे उदाहरण म्हणजे व्हेल माशाची उलटी.. आज या तस्करीच्या प्रकरणात सर्व तरुण मंडळी जिल्ह्यातीलच आहेत. याकडे आपल्या उपविभाग पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जरब असणे आवश्यक आहे जुगार मटका यामुळे पैशाच्या हव्यासाने व्यसनाधीन होऊन अनेक तरुण वैफल्यग्रस्त झालेले आहेत. गुटखा तर आज सर्रासपणे प्रत्येक टपरीवर पाहायला मिळतो. मात्र या गुटख्याच्या जिल्ह्यातील वितरकांना पोलिसांना पकडणे कधीच शक्य होत नाही. एकीकडे महाराष्ट्रात गुटखाबंदी असून देखील राजरोसपणे विकला जाणारा गुटखा पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेला काळिमा फासणारे आहे. गोवा बनावटीच्या दारुबाबत अनेकदा कारवाई झालेली दिसून येते. मात्र यात पोलिस यंत्रणेकडून केलेली दिसत नाही.
तसेच महाराष्ट्राच्या इतर भागाप्रमाणे सिंधुदुर्गात देखील काही पाकिस्तानधार्जीने समाजकंटक अथवा अन्य संघटना असल्यास त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपले स्तरावरून पावले उचलण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!