घरगुती गॅस सिलेंडरचा नॉब उघडत असताना आगीने घेतला पेट

घरगुती गॅस सिलेंडरचा नॉब उघडत असताना आगीने घेतला पेट

*कोकण Express*

*घरगुती गॅस सिलेंडरचा नॉब उघडत असताना आगीने घेतला पेट…*

*जळकेवाडी येथील बबन चव्हाण यांच्या घरातील वस्तूचे नुकसान…*

*सुदैवाने मोठी दुर्घटना टळली…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरातील जळकेवाडी येथे बबन चव्हाण यांच्या घरगुती गॅस सिलेंडरचा नॉब उघडत असताना जवळच्या असलेल्या आगीमुळे अचानक पेट घेतला. आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रसंगावधान राखत चव्हाण यांच्या मुलाने पेटता सिलेंडर घराबाहेर ढकलला. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, तेथील घराच्या छपराच्या वाशाना आग लागली.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्यासह स्थानिकांनी प्रसंगावधान राखत सिलेंडरची आग विझवली. घरापर्यत जाण्यासाठी अरूंद रस्ता असल्यामुळे घटनास्थळापर्यंत अग्निशमन बंब पोहोचू शकला नाही. परंतू नंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगून छोट्या बंबाला पाचरण केले. तत्पूर्वीच नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, माजी नगरसेवक बंडू गांगण यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!