*कोकण Express*
*कार्यसम्राट आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून घोणसरी टेंबवाडी रस्त्यासाठी ५ लाख रु चा निधी मंजूर*
*मा.सभापती मनोज रावराणे यांचा यशस्वी पाठपुरावा*
*भाजपा तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर यांच्या मागणीला यश*
कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून घोणसरी एस टी स्टँड ते टेंबवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून घोणसरी टेंबवाडीतील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. घोणसरी टेंबवाडी रस्ता मंजूर व्हावा यासाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर यांनी मा.सभापती मनोज रावराणे यांच्याकडे मागणी केली होती.
यासाठी मा.सभापती मनोज रावराणे यांनी गेली १५ वर्षे रस्त्याची कोणतीही डागडुजी झाली नसून रस्त्यावरून चालणे ही अत्यंत कठीण असल्याने रस्ता नूतनीकरण करण्यासाठी आमदार नितेशजी राणे यांच्याकडे निधीची मागणी करताच, कार्यसम्राट आ. नितेशजी राणे यांनी लेखाशिर्ष २५१५ व १२३८ अंतर्गत मंजूर विकास कामांमध्ये ५ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला.
त्यामुळे वर्षानुवर्षे मागणी असलेला रस्ता नवीन होणार असून गैरसोय दूर केलाबद्दल ग्रामस्थांचे समाधान झाले आहे.स्थानिक कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या या विकास कामांचा धडाका पाहून घोणसरीवासिय कौतुक करत आहेत.