*कोकण Express*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे धान उत्पादकतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये हे प्रमाण एकरी ४० ते ५० क्विंटल असून शासनाकडील पोर्टलवर हे प्रमाण फारच कमी असल्याने ( एकरी ८ ते ९ क्विटंल ) शेतकऱ्यांना त्यांचेकडील भात विक्री करणेस मोठी अडचण निर्माण होत आहे. तरी याबाबत आवश्यकती शहानिशा करणेत येऊन, सध्या असलेल्या एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटींग अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांकडील भात खरेदीमधील अडचण दुर होईल. तरी सदरचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटींग अधिकारी यांना देणेत यावे अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली आहे.