“त्या” कापूर कंपनीला योग्य धडा शिकवणार

“त्या” कापूर कंपनीला योग्य धडा शिकवणार

*कोकण Express*

*“त्या” कापूर कंपनीला योग्य धडा शिकवणार*

*आ.नितेश राणे;बांद्यातील व्यापारी व भाविकांचे केले कौतुक*

*बांदा ःःप्रतिनिधी* 

बांद्यातील व्यापारी,देवस्थाने व सेवेकरी यांनी हिंदू धर्मासाठी एकत्र येत जी एकजूट दाखवली आहे ती सर्वांना आदर्शवत आहे. केवळ हिंदू देवतांचे विडंबन करण्याचे प्रकार वारंवार केले जातात. हिंदू धर्माचे विडंबन आता खपवून घेतले जाणार नाही.जेव्हा अशा कंपन्यांना कडक शासन होईल.तेव्हा परत कोणी असा प्रकार करण्याची हिंमत करणार नाही. बांदावासियांनी ही त्याग आंदोलनाद्वारे हिंदूंच्या जनजारणाचा आदर्श दिला आहे. बांदावासियांनी प्रखर हिंदुत्वाचे उदाहरण दिले आहे. तर सरपंच अक्रम खान यांनी राष्ट्रीयत्वाचे उत्तम उदाहरण दिले आहे.
आता त्या कंपनी समजेल अशा भाषेत धडा शिकवायची व प्रभू श्रीरामचंद्रांची जाहीर माफी मागायला लावायची जबाबदारी माझी आहे असे प्रतिपादन कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी बांदा येथे केले. त्याग आंदोलनात सहभागी झालेली देवस्थाने, व्यापारी ,भाविक व सेवेकरी यांची बांदा येथे भेट घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधताना ते बोलत होते.
बांदा संत सोहिरा मठात आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर ,बांदा सरपंच अक्रम खान ,व्यापारी अजय महाजन ,ग्रा.पं.सदस्य जावेद खतिब उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात त्याग आंदोलनाचे प्रणेते आशुतोष भांगले यांनी गेले वर्षभऱ सुरु असलेल्या या आंदोलनाची माहीती दिली.
या आंदोलनाची दखल घेत स्वत: बांद्याला येऊऩ आंदोलकांना भेटल्याबद्दल आ.नितेश राणे यांचे आणि
आपण जाहिररित्या केलेले आवाहन आ.नितेश राणे यांच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल सरपंच अक्रम खान यांचे त्यांनी जाहीर आभार मानले. कणकवली ही योगिराज भालचंद्र बाबांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे.आणि कणकवलीचे आमदार बांद्यात आज हिंदू धर्मासाठी स्वत:हून आले हे भविष्यात सदैव सर्वांना स्मरणात राहील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री बांदेश्वर देवस्थान,श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान,दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिर,श्री साईमठ ,संत सोहिरोबानाथ मठ य़ा पाच देवस्थांचे प्रतिनिधी जयप्रकाश सावंत,राजेश पावसकर, ज्ञानेश्वर येडवे,राकेश केसरकर ,प्रसाद आंबिये, तसेच भजनकर्मी गिरिश महाजन ,व्यापारी अजय महाजन ,महिला सेवेकरी गीता गर्दे आदींना आ.राणेंच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमस्थळी येताना आ.नितेश राणे यांनी बाजारपेठेत चालत जाऊन व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत ,माजी जि.प.सदस्य श्वेता कोरगांवकर,माजी सरपंच मंदार कल्याणकर,ग्रा.पं.सदस्य राजेश विरनोडकर,उमांगी मयेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.ज्येष्ठ भजनकर्मी गिरिकाका महाजन यांनी सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आ.राणेंचे स्वागत केले. या कार्यक्रमाला बांद्यातील व्यापारी,भाविक,भजनकर्मी सेवेकरी मोठ्या संख्येेने आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!