*कोकण Express*
*ठाकरे गटाला “सुप्रीम कोर्टाचा” धक्का !*
*निवडणूक आयोग ठरवणार आमदार अपात्रता आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय*
*मुंबई*
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची स्थगिती याचिका फेटाळून लावून ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. यामुळे शिंदे गटाला दिलासा भेटला आहे. आमदारांची अपात्रता, शिवसेना नेमकी कोणाची हा निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला आता मार्ग मोकळा झाला आहे.