*कोकण Express*
*हुमरस गावातील ग्रामस्थांचा आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश*
हुमरस गावातील सदानंद चव्हाण, चंद्रदीप चव्हाण, सोनम चव्हाण,नीलम चव्हाण, प्रकाश हुमरसकर, प्रिया हुमरसकर, उज्वला चव्हाण आदी ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पक्षात प्रवेश केला.कुडाळ शिवसेना शाखा येथे झालेल्या प्रवेशात आ. वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, हुमरस सरपंच अनुप नाईक, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी , संजय भोगटे, नगरसेवक उदय मांजरेकर, गुरु गडकर, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, दिपक आंगणे, शोहेब खुल्ली, ओबीसी शहर प्रमुख राजू गवंडे, संतोष अडूळकर, अमित राणे उपस्थित होते.