*कोकण Express*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला सिंधुदुर्गातील २ हजार कार्यकर्ते जाणार*
*माजी खास.सुधीर सावंत यांनी दिली माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी हा शिंदे गटात कणकवली – मालवण तालुक्यातील सेना,भाजपा,काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते दाखल झाले आहेत.आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत,अशी माहिती माजी खा.सुधीर सावंत यांनी दिली.तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण आम्हाला सहकार्य करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला सिंधुदुर्गातील २ हजार कार्यकर्ते जाणार आहे.असे ते म्हणाले.
कणकवली येथील शिंदे गटाच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कणकवली – मालवण तालुक्यातील सेना,भाजपा,काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश केला.त्यांचे स्वागत माजी खा.सुधीर सावंत यांनी केले.यावेळी माजी जि प सदस्य संजय आग्रे, माजी सभापती संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, भास्कर राणे, बबन शिंदे, विलास साळसकर,शेखर राणे, सुनील पारकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर किंवा उदय सामंत होतील,अशी अपेक्षा होती.मात्र,भाजपाचे ना.रविंद्र चव्हाण हे पालकमंत्री झाले आहेत.ते आम्हाला चांगले सहकार्य करतील.ना.चव्हाण चांगेल कार्यकर्ते आहेत,ते पालकमंत्री झाले त्यांचा आनंद आहे,अशी प्रतिक्रिया माजी खा.सुधीर सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लागतील याची खात्री आहे.केवळ भौतिक सुविधा म्हणजे विकास नव्हे तर शेतकऱ्यांचा विकास आणि युवक युवतींच्या हाताला रोजगार म्हणजे खरा विकास होय. कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे माजी खासदार सुधीर सावंत म्हणाले .