*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना निधी उपलब्ध करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार आमदार नितेश राणे यांचा मागणीनुसार कणकवली विधानसभा मतदारसंघातील तब्बल 78 कामांकरिता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी अभिजीत तेलवेकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या विकास कामांमध्ये अनेक विकास कामे ही रस्ते खडीकरण डांबरीकरण व नूतनीकरण करणे असून कणकवली मतदार संघातील अनेक विकास कामे गेल्या अडीच वर्षात रखडली होती. या विकास कामांना एका टप्प्यातच तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आमदार नितेश राणे यांना यश आले आहे. या मंजूर विकास कामांमध्ये कणकवली, वैभववाडी व देवगड तालुक्यातील कामांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांची मुदत ही 31 मार्च 2014 पर्यंत राहणार आहे. गेल्या अडीच वर्षांचा कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यास आता प्रत्यक्षात सुरुवात झाल्या चे या शासन आदेशानुसार दिसून येत आहे. कणकवली मतदारसंघातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे दुरावस्था झालेल्या या बहुतांशी रस्त्यांची कामे हाती घेतल्याने या भागातील नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे.